Summary of the Book
कयलोळ्या, येलापे, धवो रोस, खतखते... हे शब्द वाचून गोंधळात पडायला होते. हे नुसते शब्द नाहीत, तर ही चविष्ट पदार्थांची नावे आहेत. हे पदार्थ कसे करायचे याच्या कृती रिया मोतीलाल लोटलीकर यांनी या पुस्तकात दिल्या आहेत. हे सर्व पदार्थ गोमंतकीय आहेत. गोमंतकीयांची रुचीसंपन्नता या पुस्तकातून दिसते. ब्रेकफास्ट, व्हेजिटेरियन, नॉनव्हेजिटेरियन, गोड पदार्थ असे पुस्तकाचे चार विभाग आहेत.
स्वयंपाकघरातील नेहमीच्या भाज्या आणि मसाले, पण करण्याची पद्धत वेगळी असेल, तर नेहमीच्या पदार्थांची चवही कशी वेगळी लागते, हे यापैकी काही पदार्थ करून बघितले की समजते. पोळे, भाज्या, रोस, आमटी, डाळ, सासव, तोंडाक, कोशिंबीर, तिवळ या शाकाहारी प्रकारातील पदार्थांच्या कृती समजतात. मांसाहारी प्रकारात हुमण, सुके, बांगडे, शागुती, फ्राय आदींचा समावेश होतो.