Summary of the Book
योगदास श्री जय गणेश जोशी यांना भगवंतश्रींचा दर्शनप्रसाद मिळाला आहे. त्यांचे पिताश्री आणि गुरु, कै गणेश विनायक जोशी यांचे त्यांना बालपणापासून योगमार्गदर्शन मिळाले आहे. अंधश्रद्धा, धार्मिक सोपस्कार, पारंपारिक विचार यावर त्यांना त्यांच्या वडिलांनी अत्यंत परखड मार्गदर्शन केले. या संस्कारांमुळे बालपणापासूनच त्यांनी योगमार्ग स्वीकारला. त्यामुळे प्रथम श्रीमद्भगवद्गीता आणि मग यथाकाळी उपनिषदे, विविध सुत्रे, इतर अध्यात्मिक विषय याकडे ते आकर्षित झाले. दै केसरीमध्ये त्यांनी विविध विषयांवर दहा वर्षे स्तंभलेखन केले. त्यांची भाषा अतिशय सोपी आहे. अनेक विषयांवर त्यांची निरुपणे पुस्तक रूपाने उपलब्ध आहेत. विविध विषयांवर ते साधकांना सन २००० पासून अत्यंत रसाळ भाषेत प्रवचने देत आहेत. त्यातील काही विषयांवरील प्रवचने ध्वनीफीतीच्या रूपाने उपलब्ध आहेत. योगासने. प्राणायाम, ध्यानातील अनुभूतीमधून प्रसादरूपाने प्रविष्ट झालेल्या ॐकारसाधना, गायत्रीमंत्र, हस्तमुद्रा इत्यादींचे मार्गदर्शन शिबिरांमधून योगदास करत असतात. याच पुस्तकात त्यांचा सविस्तर वाड्मयीन परिचय पुस्तकाच्या शेवटी दिला आहे.