Summary of the Book
अमेरिकेत राहून तिथे आलेल्या अनुभवाचे नेमके विश्लेक्षण करत बाळकृष्ण पडळकर यांनी हे लेखन केले आहे. अमेरिकेतील मराठी माणूस, तिथले कायदे, तेथील शहरे आणि तरुणाई, शेतीभाती आदीबाबत त्यांनी विस्ताराने लिहिले आहे.
हे पुस्तक केवळ प्रवासवर्णन नाही तर तेथे अनेक वर्षे राहून तेथील नागरी जीवनाचा अभ्यास करून लेखकाने आपली मते नोंदवली आहेत. तेथे नागरिकांसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजना, तसेच अमेरिकन सरकारची भूमिका, तेथे असणारा प्रांतवाद या सार्यांबद्दल लेखक मोकळेपणाने लिहितो. त्यामुळे वेगळी अमेरिका आपल्यासमोर उभी राहते.