Summary of the Book
'वर्तमान' हा भारताच्या राजकीय आणि सामाजिक जीवनाचं दर्शन घडवणारा भव्य 'कोलाज' आहे. यामध्ये काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि आसामपासून महाराष्ट्रपर्यंत सर्व राजकीय रंग आणि त्यांच्या छटा आढळतात. धार्मिक पार्श्वभूमीचाही सतत भास होत असतो; प्रादेशिक आणि पक्षीय स्तर भेदून त्याहून मोठया व्यक्तींचं मनोज्ञ दर्शनही घडतं. यातील व्यक्ती आपणां सर्वांच्या परिचयाच्या, घटना अगदी काल-परवा घडलेल्या, ज्याविषयी आपण आजही चर्चा करीत असतो. काही ठिकाणी नावं बदलली आहेत, एवढंच. प्रामुख्याने राजकीय व्यक्ती, पक्ष व घटनांचा हा आलेख आहे. राजकारणाशी आपला काहीही संबंध नाही, असं म्हणणार्या सामान्य माणसाला तो अंतरसंबंध दाखवून देण्याचं काम 'वर्तमान'ने केलं आहे.