Summary of the Book
राज्यसेवा परीक्षेत सध्या अनेक बदल झाले आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धरतीवर राज्य लोकसेवा आयोगाने CSAT ( सिव्हील सर्व्हिसेस अॅप्टीट्यूड टेस्ट) या पेपरचा समावेश २०१३ पासून केला आहे. या पेपरमध्ये जास्तीत जास्त गुण मिळविण्यासाठी डॉ. अजित थोरबोले यानी MPSC CSAT सिम्प्लीफाईड'मधून मार्गदर्शन केले आहे.
आयोगाच्या काठिण्य पातळीचा विचार करून दर्जेदार उतारे यात दिले आहे. विद्यार्थ्यांना नेमक्या कोणत्या ठिकाणी अडचण येणार आहे, याचा विचार करून आकलनावर भर देण्याचा प्रयत्न यात केला आहे. विविध विषयांवरील परिच्छेद देऊन प्रश्नोत्तराच्या रूपात त्याचे आकलन कसे करावे, प्रश्नांचे स्वरूप कसे असते, उत्तरे शोधताना व देताना घ्यावयाची काळजी,
आकलन व CSAT पेपर व्यवस्थापन, राज्यसेवा CSAT २०१३,२०१४ व २०१५ च्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषणसह स्पष्टीकारण, सरावासाठी यूपीएससीच्या मागील पाच वर्षांच्या प्रश्नपत्रीकांमधील मराठी भाषांतरित उतारे, प्रश्नपत्रिका दिल्या आहेत. तसेच अभ्यासासाठी टिप्सही आहेत. प्रशासकीय सेवेत येण्यासाठी पेपरमधील विद्यार्थ्यांचे कौशल्य तपासले जाते. त्यामुळे ते दाखविण्याची दिशा या पुस्तकातून मिळते.