आंधळी
Available in 2-3 days

 
Hard Copy Price: 25% OFF
R 160 R 120 / $ 2.70
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
हेलन केलरची जीवनगाथा

जगातील सर्व अंध अपंगांसाठी जिने आपले जीवन समर्पित केले त्या हेलन केलरचे जीवनचरित्र समजून घ्यायचे तर 'आंधळी’ हे पुस्तक वाचलेच पाहिजे. व्यक्तीच्या अंगी दुर्दम्य आशावाद असतो त्या व्यक्ती जीवनातल्या अनेक खडतर प्रसंगांना सामोरे जाऊन आपलं असामान्यत्व सिद्ध करतात. त्यापैकी हेलन केलर ही एक होय.

27 जून 1880 रोजी जन्मलेली हेलन केलर एका जीवघेण्यात दुखण्यात आपली तीन ज्ञानेंद्रिये गमावते आणि एका बुद्धिमान मुलीचे जग काळोखात व्यापले जाते. पण ही आंधळी मुलगी डोळसपणे आपल्या भविष्याचा विचार करते. तिचे आईवडील, मिस फुलर, ऍन सॅलिव्हन या तिच्या शिक्षिका यांच्या सहाय्याने तिने शब्दांचा शोध घेतला. आपल्या स्पर्शातून तिने अनेक गोष्टी शिकून घेतल्या. तिच्या स्पर्शसंवेदना फार तीव्र होत्या. नुसत्या हवेच्या वासावरून ती वादळ होणार आहे हे सांगत असे. आपण स्वत:च्या अपेक्षा वाढवल्या की, त्या पुर्‍या करण्याची वृत्ती आपोआप आपल्यात निर्माण होते ही खूणगाठ तिने आपल्या मनाशी बांधली होती. पराभव हा शब्द तिला माहीत नव्हता. पदवी घेताना आपल्या भाषणात ती म्हणते,

"अंत:करणात जेव्हा उंच भरारण्याची महत्त्वाकांक्षा असते तेव्हा भुईवर सरपटणे कुणालाच मानवत नाही. काळोख आणि नि:शब्दता ही आत्म्याच्या प्रगतीच्या आड येत नसते."

अशी चरित्रे ही स्फूर्तिदायी असतात. अंधांचे जीवन कळले म्हणजे डोळसांनाही जीवन जगताना वेगळी प्रेरणा मिळते. एकूणच 'आंधळी’ हे पुस्तक वाचनीय आहे.

- ज्योत्स्ना आफळे
Book Review
Write a review

आरती Walekar
19/06/2011

मी हे पुस्तक वाचण्यासाठी खूप excited आहे.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat