Summary of the Book
' म्हणून अस्तित्व कायम ठेवलेले आहे. ती प्रथमतः कथा आहे. या कथांमधून कथेचे म्हणून एक सूत्र येते. धूसर का होईना हे सूत्र असतेच. किंबहुना त्या कथासुत्राच्या अनुषंगानेच व्यक्ती येतात. व्यक्तींच्या जीवनातील घटनाही येतात. पण या कथेचे वेगळेपण असे कि, व्यक्तीच्या बाह्य वर्णनात आणि इतर कुठल्याही बाह्य तपशीलात ही कथा रमत नाही. व्यक्तींचे बाह्य तपशील जसे या कथेला महत्वाचे वाटत नाहीत तसेच घटनांचा फापटपसाराही येथे नसतो. एखाददुसर्या घटनेचे केवळ सूचन होते. लेखकाचा सगळा भर असतो व्यक्तींच्या मनातील, अंतर्मनातील भावभावना, विभ्रम, विचार आणि अमूर्त जाणिवा प्रकट करण्यावर. बहुसंख्य कथांमधून ती व्यक्तींच्या अंतर्मनातील भावजाणिवांचे संज्ञा-प्रवाह साकार करीत जाते. असे व्यक्तीमन-व्यक्तीचे अंतर्मन प्रकट होतानाच ती कधी कधी चिंतनशील होत जाते.