Summary of the Book
स्वयंपाक करण्याच्या विविध पद्धती आहेत. ब्राम्हणी स्वयंपाक ही त्यापैकीच एक. गरम मसाले, कांदा, लसूण, तेल यांचा कमीतकमी वापर करून बनवलेले शाकाहारी रुचकर पदार्थ ही या स्वयंपाकाची खासियत. ही पढत शिकून घ्यायची असेल, तर वसुधा गवांदे यांचे हे पुस्तक निश्चीतच उपयुक्त आहे.प्रारंभी त्यांनी स्वयंपाकाचे नियोजन, फोडणी, तूप कसे करायचे याचे कानमंत्र दिले आहेत.
पुस्तकात मसाले, भाजण्या, लोणची, चटण्या, कोशिंबिरी, भजी, वडे, आमटी, सार, कढी, उसळी, भाताचे प्रकार, आदी विविध विभाग करून त्यात वेगवेगळ्या पाककृतींचा समावेश केला आहे. वैशिष्ट्यपूर्ण पक्वान्ने कशी करावीत एवढेच नव्हे, तर न्याहारीचे पदार्थही कसे करावेत ते शिकवले आहे. पुस्तकाला शेफ संजीव कपूर यांची प्रस्तावना आहे.