Hard Copy Price:
R 1700
/ $
21.79
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
यात खालील ३ ग्रंथांचा समावेश होतो. भयशून्य चित्त जेथ... अनुवाद व संपादन डॉ. नरेंद्र जाधव रवींद्रनाथांच्या काव्यप्रतिभेने स्वदेश, समाज, प्रे, निसर्ग, भक्ती आणि मृत्यू अशा अनेक विषयांना समर्थपणे हात घातला होता. त्यांचे वेगवेगळे भावदर्शन घडवणार्या निवडक १५१कविता या संग्रहात आहेत. सोबत मूळ कविताही आहेत. स्वदेश (१० कविता), समाज (३० कविता), प्रे (५० कविता), निसर्ग (१५ कविता), भक्ती (३६ कविता), मृत्यू (१० कविता). अशा या १५१ कवितांपैकी इंग्रजी गीतांजलीतील कविता आहेत २७. उरलेल्या १२४ कविता इंग्रजी गीतांजलीपलीकडच्या आहेत. त्यातही १५ कविता तर मराठीत प्रथमच आल्या आहेत. उदाहरणार्थ, रवींद्रनाथांची शिवाजी महाराजांवरील कविता.
रवींद्रनाथ टागोर : युगनिर्माता विश्वमानव ‘रवींद्रनाथ टागोर : युगनिर्माता विश्वमानव’ या ग्रंथात रवींद्रनाथांचा समग्र जीवनपट, त्यांची वैचारिक जडणघडण, एकूणच जीवनदृष्टी आणि कार्यकर्तृत्वाचा विस्तृत आढावा घेण्यात आला आहे.
रवींद्रनाथ टागोर : समग्र साहित्यदर्शन रवींद्रनाथांची साहित्यातील अनुभूती जितकी प्रामाणिक होती तितकीच त्यांची साहित्याविषयीची तात्त्विक बैठक पक्की होती. ह्याची खात्री ‘साहित्यचिकित्सा’, ‘साहित्याची सामग्री’, ‘साहित्याचे तात्पर्य’, ‘विश्वसाहित्य’, ‘साहित्यविचार’ इत्यादी निबंधांतून पटू शकते. ‘सौंदर्यबोध’, ‘रंगमंच’, ‘काव्यातील उपेक्षिता’, ‘मुलांसाठी गाणी’ इत्यादी निबंधांतून रवींद्रनाथांची मूलगामी समीक्षा प्रकट होते.
या ग्रंथात त्यांच्या काही साहित्यकृतींचा अंशत: अनुवाद सादर करण्यात आला आहे. त्यांची एक प्रसिद्ध कथा ‘काबुलीवाला’, ‘गोरा’ ही गाजलेली कांदबरी आणि ‘चिरकुमारसभा’ हे प्रहसन त्यापैकी काही होत. वाचकांना त्या कलाकृती सहजासहजी उपलब्ध होणार नाहीत त्यांना रवींद्रनाथांच्या लालित्यपूर्ण साहित्याचे किमान दर्शन तरी घडावे म्हणून या कलाकृती अंशतः देण्यात आल्या आहेत.