Summary of the Book
पर्यावरण या विषयावर अतुल देऊळगावकर व अंजली जोशी यांनी मांडलेली भूमिका, लोकसत्तेच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक प्रवीण बर्दापूरकर यांनी सांगितलेला माधव गडकरी, सुरेश द्वादशीवार, अरुण टिकेकर आणि कुमार केतकर या ज्येष्ठ पत्रकारांचा अनुभव, मेंदूची रचना व कायेर् यावर प्रकाश टाकणारा चित्रा बेडेकर यांचा लेख तसेच सध्याच्या काळीतील चळवळींचा आढावा घेणारे संजय पवार, जयदेव डोळे, अविनाश डोळस यांचे लेख असा भरगच्च वाचनीय मजकूर या अंकात आहे. त्याशिवाय रमेश पाध्ये, हेमंत देसाई, दिनानाथ मनोहर, विद्याधर दाते आदींचे लेख, कथा, कविता यांचा समावेश अंकात आहे.