Summary of the Book
विविध दिवाळी आणि इतर अंकांमध्ये प्रसिद्घ झालेल्या प्रा. अनिल सोनार यांच्या कथा 'फुलपाखराचा दंश ' मध्ये संग्रहित करण्यात आल्या आहेत. समाजाच्या विविध स्तरांतील लोकांवर , विविध रुढी-प्रथांवर , भावविश्वावर प्रकाश टाकणा - या या कथा आहेत. जातीबाहेर विवाह करणाऱ्या तरुणीचे तिच्याच प्रियजनांनी उध्वस्त केलेले आयुष्य , अपमानित झालेल्या एका मनस्वी कलाकाराने आपल्या सर्वोत्कृष्ट कलाकृतीचा लावलेला सोक्षमोक्ष , आदर्श पत्नीचा पुरस्कार मिळालेल्या स्त्रीची कथा , अंधश्रद्घा झुगारून त्यांपासून दूर पळणारा आदिवासी तरुण ही या कथांमधील पात्रं. प्रत्येकाचा कशासाठी तरी संघर्ष सुरू आहे.. विषय आणि आशयाच्या दृष्टीने या कथा महत्त्वाच्या आणि वाचकांना भावणाऱ्या आहेत.