Summary of the Book
'संडे हो या मंडे रोज खाओ अंडे' असे सांगितले जाते. पण ऑम्लेट, अंडा करी, भुर्जी असे तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो. यावर उपाय म्हणजे विष्णू मनोहर यांनी 'एक सो एक अंडेका फंडा' मधील अंड्याचे नाविन्यपूर्ण व रुचकर पदार्थ बनवून त्याचा आस्वाद घेणे.
अंडा, भुर्जी रोल, अंडा पराठा, एग अप्पे, स्मोक एग, एग ६५, वऱ्हाडी ग्रेव्ही, एग लॉलीपॉप,खजूर आणि अक्रोडच्या ड्रॉप कुकीज, एग डोसा, मालवणी अंडा करी, क्रिस्पी एग स्ट्रिप्स, ऑम्लेट राइस, नारळाच्या दुधातील अंडाकरी, बेक आईस्क्रीम, आलुबुखार विथ अंडी अशी एक ना अनेक अंड्यांचे १०१ चविष्ठ पदार्थ यात दिले आहे.
अंडीप्रेमींना ही नावे वाचूनच तोंडाला पाणी सुटेल. पदार्थांची चव चाखल्यावर क्षुधाशांतीबरोबरच चवही कायम जिभेवर रेंगाळेल...