Summary of the Book
संपादक - रविंद्र काटोले.
ऊसाविषयी आतापर्यंत विपुल लेखन झाले आहे. या पुस्तकातील ३४ प्रकरणांत ऊसशेतीची तपशीलवार माहिती आहेच याशिवाय जमिनीच्या गुणधर्मानुसार ऊसाचे व्यवस्थापन, ऊस बेणेमळा व्यवस्थापन, गुळासाठी जाती, ऊसशेतीसाठी औजारे व यंत्रे इ. परिपूर्ण माहिती पुस्तकात असून संपूर्ण २०० पानांत सर्व माहिती दिल्यामुळे हे पुस्तक म्हणजे ऊसशेतीचा दीपस्तंभ व गाईडच झाले आहे. त्यामुळे ऊस उत्पादन तर वाढणारच पण शेतकरी ऊस तज्ञ होईल इतकी माहिती बिनचूक व शास्त्रोक्त दिली आहे. एक अभ्यासपूर्ण मौल्यवान पुस्तक ऊस बागायतदारांचे घरी हवेच हवे. पुस्तकाचे मुखपृष्ठ आकर्षक व किंमतही योग्य अशीच आहे.