Summary of the Book
धर्मचिंतन मांडणारा हा अजोड ग्रंथ आहे. या ग्रंथातून याज्ञवल्क्यांच्या धार्मिक, सामाजिक, राजनैतिक, सांस्कृतिक व आध्यात्मिक विचारधारेचे ज्ञान प्राप्त होते. या ग्रंथातून मूल्यसंस्कारासाठी, आचार संपन्नतेसाठी, सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी धर्मविषयक विचारला एक दिशा मिळते. यात सांगितलेला आचारधर्म, प्रत्येकाची कर्तव्ये व न्यायविषयक विचार यातून या ग्रंथाची वर्तमान उपयुक्तता लक्षात येते. धर्मानुकूल आचरणाचा उपदेश करणारा, षड्विध धर्माच्या स्वरूपाचे विवेचन करणारा, अपराधीवृत्तीवर अंकुश ठेवण्यासाठी उपाययोजना सांगणारा, आत्मशुद्धीसाठी प्रायाश्चित्ताद्वारे मार्ग दाखविणारा व धर्माद्वारे मोक्षाकडे नेणारा हा ग्रंथ मार्गदीपक आहे.