Summary of the Book
हे नाट्यसंगीत आजच्या श्रोत्याला वेगवेगळ्या पातळ्यांवर समजावे, हा हेतू मनी बाळगून त्यांनी ह्या रंगमंचीय आविष्काराची मांडणी केली. एकूण सात प्रकारे नाट्यगीतांचा हा सप्तरंगी इंद्रधनुष्याचा मोहक पिसारा विलक्षण देखणा आहे.
एखादे संगीत नाटक सादर केले, तर त्या नाटकातीलच पदे ऐकण्याचे भाग्य रसिक प्रेक्षकांना मिळते, परंतु आजपर्यंत जेवढी म्हणून संगीत नाटके रंगभूमीवर सादर झाली, त्यातल्या महत्त्वाच्या पदांना तसेच विविध नांद्या, जोडनांद्या, सूचकपदे आणि शेवटी भरतवाक्य, ह्यांची अप्रतिम गुंफण करून नटी आणि सूत्रधार सुसंवाद साधतात आणि गायक ती पदे, नांद्या सादर करतात. ह्यातला महत्त्वाचा भाग असा की, नटी आणि सूत्रधार एकमेकांशी रसिकतेने बोलत असताना त्या पदांना, नांद्या आणि जोडनांद्यांना कुठल्या रागात गुंफले आहे, ह्याचा सहजसुंदरपणे उल्लेख करतात. त्यामुळे प्रेक्षकांना रागांची ओळख होते आणि ह्या रागांच्या सुरावटी नाट्यगीतातून ऐकल्यावर, शास्त्रीय संगीताच्या बैठकीत सादर होणाऱ्या रागांशी हे श्रोते सहजपणे समरसून जातात.