Summary of the Book
एखादा प्रकल्प हाती घ्यायचा असेल तर, प्रकल्पावर काम करण्यार्यानी कोठे, काय, कोणी, केव्हा व कसे काम करायचे याचे मार्गदर्शन आधी केले की प्रकल्प सुरळीत चालण्यात अडचण येत नाही. ठरलेल्या ठिकाणी, वेळेत व पैशांत पूर्ण करण्याचे काम हे 'प्रकल्प' संज्ञेत मोडते. त्याला क्षेत्राचे, कामाचे बंधन नसते.
अशा प्रकल्पांचे नियोजनापासून ते पूर्ण होण्यासाठी काय आवश्यक असते. हे राहीव एलकुंचवार यांनी 'प्रकल्प व्यवस्थापन' मधून सांगितले आहे. शितापूर येथील वीज प्रकल्पाचा प्रकल्प व्यवस्थापक वासुदेव व त्याच्या सहकाऱ्यांच्या संवादातून प्रकल्प व्यवस्थापनाचे धडे यात दिले आहेत.
धोरण व्यवस्थापन प्रक्रिया, झगडा-व्यवस्थापन, आधारस्तंभ व्यवस्थापन, संकट व्यवस्थापन, मुल्यांकन, प्रकल्प अंमलबजावणी आराखडा, तंत्रज्ञान व्यवस्थापन, तपसणी व मूल्यवर्धन व्यवस्थापन, पथदर्शक, नकाशे, नियंत्रण प्रक्रिया, कार्य नियोजन, आर्थिक पृथक्करण, गुणवत्ता नियंत्रण, आरोग्य, सुरक्षा, पर्यावरण नियंत्रण, माहीती तंत्रज्ञान, बदल व सुधार नियंत्रण, सभांचे नियंत्रण, कार्य व्यवस्थापन, व्याख्या टप्पा, अंमलबजावणी, प्रकल्प समाप्ती आदी प्रकरणांतून प्रकल्प व्यवस्थापनाच्या सर्व अवस्थांविषयी यात मार्गदर्शन केले आहे.