Summary of the Book
श्री. राय यांच्या फेलुदा-कथा रहस्यमय खर्या; पण त्यांच्यामधली रहस्यमयता ही मुलांचे लक्ष निवेदनात गुंतवण्यासाठी म्हणून मुख्यतः उपयोगात आणली जाते. कथांमधले रहस्य फार चमत्कृतीपूर्ण किंवा हिंस्र प्रकारचे नसते. नेहमीचे वातावरण, नेहमीचे संभाषण, नेहमीच्या घटना यांच्यामध्येच केव्हातरी एक गुन्हा घडतो.
मात्र या गुन्ह्याचे घटनास्थळ म्हणून ते एखाद्या ऐतिहासिक, सांस्कृतिक किंवा निसर्गरमणीय ठिकाणाचा उपयोग करतात. त्यात त्यांचा एक हेतू असतो. पुस्तक वाचीत असताना मुलांना आपल्या देशाच्या समृद्ध वारशाचा परिचय व्हावा, तसेच सर्वसामान्य ज्ञान मिळावे, असा त्यांचा प्रयत्न असतो. म्हणूनच त्यांच्या `फेलुदा-कथा’ या केवळ करमणूक प्रधान रहस्यकथा नसतात.
आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त केलेल्या श्री. सत्यजित राय या चित्रपट दिग्दर्शकाने स्वदेशातल्या उदयोन्मुख पिढीच्या हाती दिलेल्या आपल्या सांस्कृतिक वारशाची वानगी म्हणजे या फेलुदा-कथा.