Summary of the Book
आयुष्यात अनेक गोष्टी मनाविरुद्ध घडतात, तर काही मनासारख्या. आवडत्या व्यक्तींचे स्वभाव भिन्न असले तरी मैत्री, प्रेम काय टिकते. मात्र काही वेळा यात अपयश येते. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात यश, पैसा, प्रेम यासाठी काहीही करण्याची अनेकांची तयारी असते. या काळातील बदललेली जीवनशैली, जगण्याचे प्रश्न, त्याची उत्तरे शोधण्याची पद्धत, नातेसंबंधातील बदल लक्षात घेऊन नीलिमा बोरवणकर यांनी झळाळ मधील कथा सादर केल्या आहेत.
गायिका मोहना जयेश, वाहनचालकाची पत्नी ते यशस्वी राजकारणी हा टप्पा गाठणारी, त्यासाठी किंमत मोजणारी जानकी, पतीच्या निधनानंतर मुलगी तुलिकाश राहणारी मेघना, साधी गृहिणी, पण अचानक आलेल्या संधीमुळे कंपनीची प्रतिनिधी म्हणून जगभरात संचार करणारी व मैत्री तुटल्याची सल बाळगणारी अर्पणा अशा अनेक नायिकांच्या या कथा नव्या जमान्यातील संदर्भ घेऊन येतात. संयमी, सकारात्मक व वास्तव दृष्टिकोन यातून डोकावत असल्याने त्या भावतात.