Summary of the Book
गौरी-गणपतीनंतर वेध लागतात ते नवरात्रोत्सवाचे. आदिमातेची विविध रूपांत या काळात पूजा बांधली जाते. कुलदेवतेची उपासना केली जाते. तुळजापूर, कोल्हापूर, औंध, वणी, माहूरगड, बदामी, आदी देवींची स्थाने अनेकांची कुलदैवते आहेत. यांपैकी बदामी येथील श्री वनशंकरी किंवा श्री शाकंभरी देवीची समग्र माहिती अशोक शामराव कुंभोजकर यांनी 'श्री शाकंभरी देवीची समग्र माहिती अशोक श्यामराव कुंभोजकर यांनी श्री शाकंभरी देवी समग्र साहित्य संकलन'मध्ये दिली आहे.
शाकंभरी देवीचे ऋग्वेदातील वर्णन, तिच्या नावाचा संदर्भ सांगून तिच्याविषयी ११ कथा, शाकंभरीमाता चरित्र, मातेची उपासनेची पद्धत, बागलकोट जिल्ह्यातील बदामी तालुक्यातील चोळचगुड्ड या गावातील शाकंभरी मंदिर, तेथील नित्य पूजा, बदामी येथील श्री शाकंभरी पूजा, बदामी बनशंकरीचा नवरात्र महोत्सव, घरोघरी बसविले जाणारे श्री शाकंभरी नवरात्र, त्यातील धार्मिक विधी, ध्यानश्लोक, श्री सुक्त, शाकंभरी देवी महात्म्य, शाकंभरीमातेचे चरित्र, कुळधर्म, अभ्युदयासाठी कुलदैवतेची उपासना, कुंकूमार्चनविधी, ज्ञानेश्वरीतील 'शांभवी' ज्ञान, शाकंभरी देवीची महाराष्ट्रातील व अन्य राज्यांतील मंदिरे, शाकंभरी स्तोत्र आदींची माहिती यात येते.