Summary of the Book
वेगवेगळ्या क्षेत्रांतील स्त्री कलाकार काम कशा करतात, कशा जगतात, हे जाणून घेण्याचा प्रयत्न 'स्पॅरो'संस्थेच्या दृश्य कथा कार्यशाळेत केला होता. कालाकार स्त्रियांच्या कामातून, जगण्यातून, अनुभवातून, त्यांनी त्यांच्या क्षेत्रात मिळवलेल्या स्थानातून त्यांची ओळख होते. त्यांच्यावर चरित्रपुस्तिका काढली जाते. अशा काही स्त्री कलाकारांच्या सर्जनशिलतेचा साक्षात्कार 'सृजनाचे साक्षात्कार' मधून घडतो. चित्रपट अभिनेत्री प्रमिला, पाषाणातून शिल्प घडविणारी कनका, कथक नर्तिका दमयंती जोशी, पत्रकारिता करताना रंगमंचावर सावित्रीबाई फुले साकारणारी सुषमा देशपांडे आदी कलाकारांचा शोधप्रवास यातून उलगडला आहे.