Hard Copy Price:
22% OFF R 230R 180
/ $
2.31
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
eBook Price:
25% OFFR 230R
172
/ $
2.21
Buy eBook
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
अॅडॉल्फ हिटलर म्हंटले की साहजिकच आपल्यासमोर जर्मनीचा क्रूरकर्मा उभा राहतो. ज्यूंचा द्वेष करणाऱ्या हिटलरने लाखो ज्यू नागरिकांची हत्त्या केली. संपूर्ण जगावर राज्य करायचे आणि संपूर्ण जगाचा नाश करायचा, असे स्वप्न पाहणाऱ्या हिटलरच्या हृदयाचा ताबा इव्हा ब्राऊन यांनी घेतला होता. इव्हा व हिटलर यांची भेट खूप उशिरा झाली.
तेव्हा हिटलर ४० वर्षांचा होता व इव्हा विशीत. दोन्ही जर्मनीचे एकत्रीकरण व संपन्न राष्ट्र म्हणून जर्मनीला ओळख देण्याचे त्याचे धेय्य पूर्ण होण्यासाठी तिने त्याला पूर्ण साथ दिली. तिने त्याच्यावर मनापासून प्रेम केले. शेवटपर्यंत त्याच्याशी एकनिष्ठ राहिली. म्हणूनच मृत्यूला कवटाळण्याच्या काही तास आधी हिटलरने तिच्याशी विवाह केला.
इव्हा ब्राऊन ही इव्हा हिटलर झाली आणि त्यानंतर ते दोघे मृत्यूला सामोरे गेले. त्यांची अद्भूत प्रेमकहाणी मंदा खापरे यांनी 'मी, मिसेस इव्हा हिटलर' मधून यांनी सांगितली आहे. यात इव्हाने तिचे अॅडॉल्फवरील प्रेम तसेच 'युगपुरुष' बनण्याचे त्याची इच्छा, त्याचे चरित्र, त्याच्या व्यक्तीमत्वाचे विविध कंगोरे यातून दाखविले आहेत.
हे पुस्तक म्हणजे इव्हा च्या story पेक्षा, इव्हा च्या नजरेतून 'Adolf Hitler' ची story आहे.
इव्हा ही Adolf वर नितांत प्रेम करणारी निष्ठावंत प्रेयसी. तर Adolf Hitler हा आपल्या देशावर प्रेम करणारा निष्ठावंत देशप्रेमी. त्याला जर्मनी बद्दल आस्था होती, प्रेम होतं, अभिमान होता. यासाठीच तो सारं काही करत होता. देशासाठी त्याने आपलं सारं आयुष्य वेचलं. लग्न नाही केलं, संसार नाही मांडला. त्याच्या 'ज्यू' विरोधी भूमिकेमुळे तो वाईट ठरला. परंतु जर्मनी मधील नागरिकांना तो हवा होता. त्याला जगात फक्त आर्यवंशीय लोकांचीच वस्ती बसवायची होती. त्याला संपूर्ण जग एका छत्राखाली घेवून सुंदर बनवायचं होतं, त्याच्या चित्रकारीतून ते जाणवायचं सुद्धा. निर्व्यसनी असलेला Adolf उत्तम चित्रकार होता. त्याची वक्तृत्व शैली खिळवून ठेवणारी होती.
आजही आपण हुकुमशाही वृत्तीला 'हिटलर' असंच संबोधतो. अजून पर्यंत त्याच्या विरुद्धच ऐकत आलेलो आहोत. या पुस्तकातून Adolf ची बाजू समजते.