Summary of the Book
आपल्या व्यक्तीमत्वाचा पहिला ठसा उमटतो तो आपल्या प्रथमदर्शनानं. त्यावरच आपल्याबद्दलच मतही अवलंबून असतं, हे ब-याचं जणांच्या ध्यानी नसतं; पण हे वास्तव आहे. आपलं नैसर्गिक रूप आपल्या हातात नसलं, तरी आरोग्य-आहारानं आपलं व्यक्तिमत्व खुलवणं मात्र नक्कीच आपल्या हातात असतं. त्यासाठी जागरूकपणे कोणकोणत्या गोष्टींचा अवलंब करायला हवं, याचा परिचय या पुस्तकात आहे. तो, आरोग्यपूर्ण सौंदर्यवर्धनासाठी जागृत असणा-या आपणा सर्वांनाच लाभदायक ठरेल, अशी खात्री वाटते.