Summary of the Book
आल्बर्ट आईन्स्टाईनचे नाव जगभरातील शास्त्रज्ञ, विद्यार्थी, नागरिक यांच्यासाठी आदर्श आहे. विसाव्या शतकातील मानव म्हणून ‘टाइम’ नियतकालिकाने त्याचा गौरव केला होता. ‘जागतिक भौतिक वर्ष’ २००५ मध्ये साजरे झाले. त्या वेळी त्याच्याविषयी सर्वत्र खूप काही लिहून आले; पण तरी त्याचे काही पैलू अज्ञात होते, ते डॉ. बाळ फोंडके यांनी ‘अज्ञात आईन्स्टाईन’मधून प्रकाशात आणले आहेत.
गणित, विज्ञान, तत्त्वज्ञान या विषयांमध्ये रमणारा आल्बर्ट शाळेत फारसा रमला नाही. नंतरच्या जीवनात ‘सापेक्षतावादाचा सिद्धान्त मांडणारा आईन्स्टाईन,’ अशी त्याची ओळख झाली असली तरी त्याने लेसर प्रकाश, उपग्रह प्रणाली, जीपीएस यंत्रणा, कॉम्पॅक्ट डिस्क या सध्या रोजच्या व्यवहारातील तंत्रज्ञानाचा जनक आईन्स्टाईन आहे, हे आपल्याला यातून कळते. तसेच त्याच्या आयुष्यातील रंजक भागही यात आला आहे.