Summary of the Book
पूर्वी लागले-खुपले किंवा काही आजारपण उद्भवले की घरातील मोठी माणसे घरगुती उपचार करीत असत; पण आता आधुनिक काळात अशी सहज उपलब्ध होणाऱ्या औषधांकडे दुर्लक्ष होत आहे. आपल्या देशात औषधी वनस्पतींचा खजिना आहे. त्याची आठवण व त्यांचे फायदे वाचकांपर्यंत पोचविण्याचे काम डॉ. लीना राजवाडे आणि डॉ. माधवी वैद्य यांनी केले आहे.
'आनंददायी आरोग्यासाठी'मधून त्यांनी सोपे, घरगुती आयुर्वेदिक उपचार सांगतिले आहेत. अक्कलकारा, आक्रोड, आघाडा, अळू, ऊद, ऊस, कलिंगड, कडूनिंब, कापूर, कापूस, कांचन, केळे, गवती चहा, कॉफी, गोमुत्र, चमेली, जाई, चिंच, तोंडली, दवणा, दुध, विड्याचे पान, निवडुंग वेल, मध, मोरपिसे, माती, वड, सुर्यफुल, आदी विविध वनस्पतींची उपयोगिता, आणि त्या कोणत्या विकारावर वापरता येतात हे सांगितले आहे.
तसेच अर्धशिशी, अल्सर, अनियमित मासिक पाळी, अनिद्रा, उलटी, कुत्रा चावल्यास, गालगुंड, घसा बसणे, चेहऱ्यावरील सुरकुत्या, जखम, डासाचा दंश, पिंपल्स, तोंडातील फोड, बेड सोअर्स आदी आजार, विकार झाल्यास गुणकारी औषधांची माहिती दिली आहे.