Summary of the Book
शंकर महाराज हे शिवशंकर, श्रीस्वामी समर्थ व अष्टावक्र स्वामी यांचे अवतार मानले जातात. दत्तात्रेयांच्या आज्ञेनेच अष्टावक्र स्वामींनी शंकरमहाराजांच्या रुपात अवतार घेतला, असे सांगितले जाते. त्यामुळे अष्टावक्र स्वामींप्रमाणेच शंकरमहाराजही दिसत होते. शंकरमहाराज यांच्या चरित्रकथा, त्यांचे वागणे, उपदेश, त्यांचे कार्य भगवंत वासुदेव अघोर यांनी शंकर-गीता या ओवीबद्ध ग्रंथातून भक्तांपर्यंत पोचविले आहे.
१८ अध्याय व १०८ ओव्यांचे निरुपण सुहास गोविंद नाईक उर्फ नामदास यांनी 'श्री शंकर-गीता अनवट कृपेच्या अमृतधारा'मधून केले आहे. शंकरमहाराज यांच्या जन्मापासून त्यांच्या कार्याचा सर्व तपशील यात आहे. आधी कथाभाग व नंतर त्याचे निरुपण असे याचे स्वरूप आहे. कथेत येणाऱ्या तपशिलाचे सोप्या भाषेत व विविध वचने, प्रमाणासह केलेल्या निरुपणातून भक्तांपुढे महाराजांचे अंतरंग उलगडले आहे.