Hard Copy Price:
25% OFF R 200R 150
/ $
1.92
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
प्रेम करणे हा मानवी मनाचा एक स्थायिभाव आहे. प्रेम प्रगटीकरणाच्या विविध पद्धती असल्या तरी 'मुग्ध प्रेम' हे एक अजब रसायन मानवी प्रवृत्तीत आहे. अशाच प्रेमाच्या अकरा प्रेमकथा श्री. शहाजी कांबळे यांच्या 'मुग्ध प्रेमकथा' या कथासंग्रहामध्ये वाचकांना प्रेमाच्या एका अनोख्या भावविश्वात घेऊन जातात आणि वाचकांच्या मनावर या प्रेमाचे एक विलक्षण गारुड इतक्या सहजतेने पसरवतात की एका कथेनंतर दुसरी अशा तऱ्हेने या अकरा कथा आपण झपाटल्यासारखे वाचून काढतो. उत्सुकता आणि गतिशीलता ही या कथांची दोन प्रमुख वैशिष्ट्ये असल्यामुळे संपूर्ण कथासंग्रह वाचल्याशिवाय आपल्याला चैन पडत नाही. ओघवत्या भाषेच्या आधारे श्री. शहाजी कांबळे यांनी वाचकांना खिळवून ठेवण्याचे सामर्थ्य प्राप्त केलेले आहे हे निर्विवादपणे मान्य करावे लागते. मानवी स्वभावाच्या विविध पैलूंवर आधारित या प्रेमकथा आहेत. 'लग्नगाठ' मधून 'वारस' निर्माण होतो पण 'निपुत्रिक' तेचे 'ग्रहण' हे 'सावली' सारखे माई, ती' या दोघींमधील 'अव्यक्त प्रेम' काहीसे 'पाहुणा' होऊन 'मित' भाषी होतं आणि यातूनच या 'मुग्ध प्रेमकथा' जन्माला येतात आणि वाचकांच्या हृदयाला स्पर्श करून जातात. 'सावली' ही कथा अतर्काच्या पत्नीकडची, आजच्या वैज्ञानिक युगात एक अद्भुतरम्यच म्हणावी लागेल. तरीही या कथेमध्ये वाचक गुंतून जातो हे वैशिष्ट्यपूर्ण आहे.