Hard Copy Price:
25% OFF R 100R 75
/ $
0.96
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
मार्जारकुळ म्हणजे निव्वळ मांजर, वाघ, सिंह आणि बिबळ्या नाही. इंग्रजीत फेलिडी फॅमिली (Felidae Family)असा उल्लेख होणारं हे कुळ खूप मोठं आहे. भारतीय उपखंडात या फेलिडी कुळातले पाळीव मांजर हा सदस्य वगळता अजून सोळा सदस्य आढळून येतात. या सोळा सदस्यांची वर्गवारी फेलिस (Felis) जाती आणि पँथेरा (Panthera) जाती अशी केली जाते. या जातींना शास्त्रीय भाषेत 'जीनस' असं उल्लेखलं जातं. यातल्या फेलिस जीनसमध्ये दहा मांजर आणि पँथेरा जीनसमध्ये चार मोठी शिकारी मांजरं विभागली गेली आहेत. या सगळ्या वन्यजीवांचा अभ्यास खूपच मनोरंजक आहे. फेलिस गटातील लहान मांजरं गर्जना करू शकत नाहीत, तर पँथेरा जीनस मधली मोठी शिकारी मांजरं गुरगुरणे आणि गर्जना करणे सारखे प्रकार करू शकतात. दोन्ही गटातल्या काही सदस्यांना जाणून घेताना या फेलिडी कुटुंबाबद्दल खूप रंजक माहिती मिळत जाते. शिकार करताना या सर्व मांजरांना आपल्या सुळ्यांचा, नखांचा प्रचंड वापर करावा लागतो म्हणूनच ही यांची महत्वाची शस्त्रं समजली जातात. भक्ष पकडायला, धावताना स्वतःच्या नखांना इजा होऊ नये म्हणून ती आत घेणे, त्यांना धार काढण्यासाठी झाडांवर घासणे अशा गोष्टी ही मांजरं का करतात? हे त्यांचा अभ्यास करायला लागला कि सहज कळून जात. दबकत येताना पायाचा आवाज होऊ नये म्हणून मांजरांना पायांना गाद्या असतात. पाचोळ्याचा आवाज होऊन भक्ष सावध होऊ नये म्हणून चालण्याची कला मांजर कशी साधतात हेही आश्चर्यकारक आहे. एका मांजराचा अभ्यास म्हणून माहिती करून घ्यायला सुरुवात केली तर इतर अनेक सदस्यांच्या मजेशीर गोष्टी कळून येतात. मांजर, त्यांचं निसर्गातील स्थान, त्यांची जीवनशैली अभ्यासायला सुरुवात केली कि निसर्गाचे एकमेकांशी जोडलेले अनेक पदर सहज उलगडत जातात.