Summary of the Book
घनदाट वनराईने नटलेल्या आणि विविध प्रकारच्या पशु-पक्ष्यांनी गजबजलेल्या अरण्यवाटा चोखाळायचा मोह आपल्यापैकी प्रत्येकालाच होतो; आणि त्यातूनच मग आपली पावलं वळतात ते आसेतूहिमाचल पसरलेल्या विविध राष्ट्रीय उद्यानं व अभयारण्यांकडे... पण तिथे जाताना हा पुस्तकरुपी वाटाड्या सोबत असेल तर? नव्हे हवाच! महाराष्ट्रासहित भारतातील सर्व राज्यांतील महत्त्वाची राष्ट्रीय उद्यानं आणि अभयारण्यं यांची पत्ता व संपर्क क्रमांकांसह सविस्तर माहिती एकत्रितपणे उपलब्ध करुन देणारे हे मराठीतले एकमेव पुस्तक!