Summary of the Book
आयुर्वेदाप्रमाणेच लोकप्रिय असणारी उपचार पद्धती म्हणजे होमिओपॅथी. डॉ. अनंत गोपाळ पळसुले यांनी या पॅथीची ओळख करून दिली आहे,
त्याशिवाय विविध रोगांवर होमिओपॅथीची औषधे कोणती, कशी वापरावीत याचे मार्गदर्शन केले आहे. प्रत्येक रोगासाठी स्वतंत्र प्रकरण दिले असून,त्यामध्ये रोगाच्या लक्षणापासून, कारणांपर्यंत आणि उपचारांपर्यंत सर्व प्रकारची माहिती समाविष्ट केली आहे.
वयानुसार औषधे कशी घ्यावीत, औषधांच्या दोन डोसमध्ये अंतर किती ठेवावे, गोळ्या खातानाची पद्धती यांविषयीही पुस्तकात मार्गदर्शन केले आहे. दैनंदिन जीवनात घरच्या घरीउपचार करण्याच्या दृष्टीने आणि जास्तीत जास्त लोकांना ते उपयुक्त ठरावे याचे उद्दिष्ट ठेऊन या पुस्तकाची निर्मिती केली आहे.