Summary of the Book
‘निर्मळ रानवारा’ हा वंचित विकास संस्थेतर्फे प्रकाशित होणारा लहान मुलांचा अंक. यंदाच्या दिवाळीत मुलांना भटकंतीचा अनुभव घेता यावा यासाठी ‘निर्मळ रानवारा’ने भटकंती विशेषांक प्रकाशित केला आहे. दिवाळीच्या सुट्टीमध्ये भटकंतीचा अनुभव घेताना, ट्रेकिंग करताना येणारे वेगवेगळे अनुभव, सावधानता, प्रवासाची कारणे असे सारे काही या अंकामध्ये देण्यात आले आहे. आवळीभोजनाची मजा कशी येते, अवखळ भटकंती कशी असते, चांदण्या रात्रीची भटकंतीची मजा कशी असते, याचबरोबर निसर्गसुंदर श्रीलंका कशी आहे, तेथे काय-काय आहे आदी गोष्टी खास मुलांसाठी, त्यांच्या खास शैलीत मांडण्यात आल्या आहेत.व्यक्तिमत्त्व विकासामध्ये भटकंतीचा कसा उपयोग होतो याबाबत विशेष लेखदेखील यात आहे. छोट्या मुलांच्या लेखनाबरोबरच सरिता पदकी, महेश तेंडुलकर, प्रदीप प्रभुणे, रेणु दांडेकर, डॉ. नीलिमा गुंडी आदींच्या साहित्याने हा अंक नटला आहे.