Hard Copy Price:
15% OFF R 550R 468
/ $
6.00
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
विहिरीत अंधार आहे. डोकावून पाहिलं तर भोवळ वगैरे येईल इतपत अंधार. अंधारात काहीही असू शकतं; काहीही म्हणजे काहीही. पण ते काहीही म्हणजे नेमकं काय? हे आत उतरल्याशिवाय कळणार नाही. आजवर आयुष्यातल्या अप्रिय, असह्य, नको असणाऱ्या गोष्टी मी विहिरीत टाकल्या. अगदी अडगळीत टाकाव्या तशा टाकल्या. पण विहीर म्हणजे अडगळ नाही. विहिरीत आई आहे, अण्णा आहेत. विहिरीत काकूचं बाळ आहे, नंदाकाका आहे. विहिरीत दमी, तायडी आणि सुपडीही आहे. विहिरीत अनेक उत्तरं आहेत. अशा प्रश्नांची उत्तरं जे प्रश्न मला कधी पडलेच नाहीत; किंवा जे प्रश्न मी स्वतःला कधीच पाडून घेतले नाहीत; किंवा असे प्रश्न ज्यांची उत्तरं मी कधी शोधलीच नाहीत. विहीर माझ्या आयुष्याचा रहस्यभेद आहे, जो अनेकदा शक्य असूनही मी आजवर कधीही केलेला नाही. विहिरीत उतरणं हे माझं प्राक्तन नाही. विहिरीत उतरणं हा मी राजीख़ुशी निवडलेला एक पर्याय आहे. बाहेरच्या वास्तवाला तोंड देण्यापेक्षा विहिरीत लपून बसणं कधीही सोपंच.
दंशकाल कादंबरी आज वाचुन संपली.कादंबरीच्या शेवट शेवटचे प्रकरणं ती एक भय आणि गुढतेकडे न वळता एक श्रुंगारीक आणि कामवासनेकडे जास्त वळायचे वाचण्यास आले.नानुला सुरवातीपासून काकूचे आकर्षण होते हे माहिती आहे पण मुख्य मुदा हा होता आणि कादंबरीची सुरवात ज्याचा पासून झाली ती भानुकाका मध्ये नेमके दादूमियां व भीवलीबाय कसे प्रकट झाले याचे,त्याचे सन्धर्भ शेवट पर्यन्त दिले गेले नाहीत.भानुकाकाने जरी ते नानुला सांगितले असते शेवटी शेवटी की नेमके कशामुळे हे दादूमिया आणि भीवलीबाय त्यांचात प्रकट झाली तर अजून वाचण्यास मजा आली असती आणि नानु त्याच्या डॉक्टरी बुद्धा आणि अनुभवातून बरी करून त्यानां बरे केले असते आणि काकूला पुन्हा तिचा नवरा बरा करून दिला असता तर खरंच त्यानी उध्वस्त झालेल्या आपल्या घरचे आणि आई , अण्णा , आजी व काकूचे मने जिंकून घेतली असती.बाकी आधी आई आणि पुढे काकू यांची फार दया आली.एकंदर छान लेखणी व सुरेल वास्तू रेखाटली आहेत तुम्ही ज्यात आधी भुईगावचे घर त्यातील विविध खोल्या मग शहरी बंगला आणि शेवटी विहीर .तो एक भानुकाका मध्ये कशामुळे प्रकट होण्यास पत्राचा खुलासा केला असता तर अजून मजा आली असती .
Yogesh Jadhav
24/04/2018
Nice Book... Subject is different, but still it is good...