Summary of the Book
"इस्लाम आणि आधुनिक जग" या माझ्या लेखांमधून मी इस्लामच्या मूळ स्त्रोताकडे जाण्याचा प्रयत्न केला आहे. इस्लामी धर्मशास्त्राचे पवित्र कुराणाच्या परिप्रेक्षातून विश्लेषण करून त्यातून नवदृष्टी देण्याचा माझा प्रयत्न आहे. इस्लामचे सगळेच अभ्यासक ’इत्जेहाद’ ची संकल्पना मान्य करतात. ’इत्जेहाद’ म्हणजे वेळोवेळी निर्माण होणाऱ्या नवनवीन समस्यांची बौद्धिक तसेच आध्यात्मिक अंगाने मांडणी करणे. मागील शतकापासून मुस्लीम समाजापुढे अनेक नवीन प्रश्न उपस्थित झाले आहेत. या प्रश्नांची उकल करण्यासाठी, ते पद्धतशीरपणे समजून घेण्यासाठी पवित्र कुराणाची कशी मदत होते, हे मला वाचकांसमोर मांडायचे आहे.