Summary of the Book
एक स्त्री असते. नवरा, मुलंबाळं यालाच आपलं सर्वस्व मानणारी. एके दिवशी तिला समजतं, आपल्या मानलेल्या विश्वातून आपल्याला हद्दपार व्हावं लागणार आहे. मग सुरू होतो तिचा संघर्ष, स्वत:च्या अस्मितेचा शोध. आधुनिक सुशिक्षित स्त्रीच्या अस्मिताशोधासाठी चाललेल्या संघर्षाचे विविध परिमाणांतून चित्रण करणारे ह. मो. मराठे यांचे कथाचक्र.