Hard Copy Price:
15% OFF R 180R 153
/ $
1.96
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
दळवी म्हणत, ’’माणसाच्या भागधेयात सोळा-सतराच्या वयात जे घडतं, ते त्याला जन्मभर पुरतं आणि तेच त्याचा जन्मभर पिच्छाही पुरवतं.’’
मग दळवींचं भागधेय काय होतं? त्या वयात त्यांनी काय पाहिलं, काय अनुभवलं, की, ज्यानं आयुष्यभर त्यांचा पिच्छा पुरवला? जे सतत त्यांच्या साहित्यात डोकावत राहिलं? आयुष्यभर दळवींनी आपल्या वागण्यानं इतरांच्या मनात कुतूहल निर्माण केलं, आणि मरणानंतरही ते तसंच जागं ठेवलं.
दळवी खरे कसे होते?
हा आहे त्यांना जाणून घेण्याचा एक प्रयत्न. त्यांच्या पूर्वायुष्यातील काही घटनांमधून. साहित्यात प्रतिबिंबित झालेल्या त्यांच्या व्यक्तिगत अनुभवांतून. त्यांच्या पत्रव्यवहारातून. मित्रमंडळी आणि नातेवाइकांशी झालेल्या संभाषणातून आणि खुद्द दळवींशी झालेल्या गप्पागोष्टींमधून.