Summary of the Book
• वीजमंडळ, रेशनकार्ड, गॅस
• विविध शासकीय सेवा
• बँका, विमासेवा
• माहितीचा अधिकार
• टेलिफोन, मोबाईल
• ग्राहक संरक्षण कायदा
• हाउसिंग सोसायटी विषयक नियम
• केंद्र अन् राज्य सरकारची तक्रार-निवारण यंत्रणा
रोजच्या आयुष्यातील अशा कितीतरी बाबींमध्ये आपण सारेजण ग्राहकाच्याच भूमिकेत वावरतो. गुणवत्तापूर्ण वस्तू अन् सेवा मिळण्याचा अधिकार ग्राहक म्हणून साऱ्यांनाच असतो. मात्र बरेचदा आपल्याला आपल्या या अधिकाराची जाणीव नसते. दैनंदिन जीवनातल्या कितीतरी गरजांबद्दलच्या अशा आपल्या अधिकारांची उपयुक्त माहिती देणारे, हरघडी येणाऱ्या अडचणींवर खात्रीशीर उपाय सांगणारे असे हे पुस्तक आहे.