Summary of the Book
व्यक्तिचित्र रंगवण्यात एक वेगळंच आव्हान आहे.
एक वेगळीच किक आहे.
हे आव्हान, ही किक मी मनापासून एन्जॉय करतो.
सर्कशीतल्या गोळ्यात फटफटी चालवण्याचं
‘थ्रील’ या प्रकारच्या लिखाणात आहे.
एकही वाक्य कक्षेबाहेर जाऊन चालत नाही.
यात एक गंमत आहे.
आधी त्या माणसाच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वाचा
आढावा घ्यायचा, आपल्याला त्यातली कुठली गोष्ट
अधोरेखित करायची आहे याची मनाशी खूणगाठ बांधायची;
मग आपल्या लेखनशैलीला कौल लावून
‘हरी ओम्’ करायचं.
लिहिताना मध्ये मध्ये थांबून सगळं नीट चाललंय ना,
याची खात्री करून घ्यायची.
माझी तरी ही पद्धत आहे.
इतर यशस्वी शब्दचित्रकार काय करतात कोण जाणे.