Hard Copy Price:
25% OFF R 100R 75
/ $
0.96
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available
Preview
Summary of the Book
आनंदाची निराळी वाट ह्या पुस्तकाच्या पाठोपाठ माझे पितृतुल्य चुलते पत्रकार डी. व्ही. मुळे यांचे अवघ्या तीन महिन्यात प्रसिद्ध होणारे " आयुष्यावर बोलू कांही " जेष्ठाधार " नाती व स्मृती जपा. " हे दुसरे पुस्तक प्रसिद्ध होत आहे याचा मला खूप आनंद होत आहे. त्यांच्या कामाचा झपाटा हा सर्व तरुणांना प्रेरणा घेण्यासारखा आहे. ज्येष्ठाधार या पुस्तकात ज्येष्ठांच्या सध्याच्या समस्या, अडीअडचणी व त्यावरची उपाय योजना या बाबत उदबोधनपर लेखन डी. व्ही. मुळे यांनी केले असून त्यांनी सखोल चिंतन व मनन करून लोप पावत चालत असलेल्या भारतीय संस्कृतीचे पुनरुज्जीवन करण्याचा स्त्यूत्य प्रयत्न केलेला आहे. ज्येष्ठाधार या आपल्या पुस्तकात त्यांनी लोप पावत चाललेल्या एकत्र कुटुंब पद्धती बाबत व "हम दो हमारे दो या विभक्त कुटुंब पद्धती बाबत" सखोल अभ्यास करून परखड व सडेतोड लिखाण करून समाजाला वैचारिक दिशा दिलेली आहे. ज्येष्ठत्व हे जीवनात प्रत्येक व्यक्तीसाठी अविभाज्य घटक आहे हे विसरता कामा नये. सध्याच्या बदलत्या काळात "नाती व स्मृती" जोपासणे ही काळाची खरी गरज झालेली आहे. याबाबत त्यांनी मांडलेले विचार खूप मौलिक व विचार करण्यासारखे आहेत. प्रत्येकांनी आपल्या कुटुंबात हे पुस्तक संग्रही ठेऊन त्या मधील विचार अंमलात आणावेत. आयुष्यात खूप मोठे व्हा परंतु आपले आई वडील, आजी-आजोबा, समाज व देश यांना लहान समजण्या इतके मोठे होऊ नका हे त्यांचे विचार अंमलात आणणे ही काळाची गरज होय. ज्येष्ठाधार या पुस्तकाला माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा .