Summary of the Book
'सर्जनप्रेरणा आणि कवित्वशोध' या ग्रंथाचे चिंतनशील लेखक प्रा. डॉ. मी. पाटील कलानिर्मितीच्या आदिम, त्या प्रेरणांशी अनुबंध असणारे छंद, लय, आत्मविष्कार, भावकीडा इत्यादी विविध पैलूंचा या या ग्रंथात मानसशास्त्रीय अंगाने मागोवा घेतला आहे. सर्जनशक्तीचे विकसन कसकसे होते याचा धांडोळा घेतानाच, विचार, तत्वज्ञान, सौंदर्य आणि कलामीमांसा यांचे वेचक कवी आणि त्यांच्या कविता यांच्या उदाहरणांतून अभिजात आणि रोमँटिक काव्यविचाराशी निगडित असलेले नातेही ते उलगडून दाखवतात. त्याची व्याप्ती विसाव्या शतकाच्या अखेरच्या पर्वातील नवकवींच्या काहीशा वास्तवनिष्ठ आणि बुद्धिनिष्ठ कवितांपर्यंत पोचते.
कविमनाचे विशेष, त्यावरील विविध प्रभाव, प्रतिभा, संवेदनशीलता यांचा आदिबंधात्मक रूपवेध घेताना, विश्वविख्यात पौर्वात्य आणि पाश्चिमात्य अभिजात कवी, मानसशात्रज्ञ, तत्त्वचिंतन, सौंदर्यमीमांसक यांच्या विविध मत - मतांतरांचा मर्मज्ञ, रसिकतेने आढावा घेतल्यामुळे या ग्रंथाला मौलिक परिमाण लाभले आहे. त्यामुळे हे लेखन संदर्भबहुल तर झाले आहेच, शिवाय लेखनात काव्यात्म लय अनुस्यूत असल्याने वाचकमनावर गरुड करण्याची किमयाही त्यांनी साधली आहे.