Summary of the Book
स्वयंपाक करताना आरोग्य हे प्रथमस्थानी असणे आवश्यक असते; मात्र आजकाल चवीला प्राधान्य आले आहे. तरीही चव आणि स्वास्थ्य या दोन्हीचा मेळ घालणेही बऱ्याच वेळा शक्य असते. याच धर्तीवर "जिचे हाती कढई' हे पुस्तक बेतलेले आहे. या पुस्तकात विषयांचे वैविध्य आहे. उच्च रक्तदाब, हार्ट ऍटॅक, किडनी दोष, वाढते फॅट्स या आजारांची कारणे, आहाराच्या सवयी, पदार्थांमधील कॅलरीज व इतर पोषणमूल्ये यांचे प्रमाण हे सर्व पुस्तकात आहेच; पण याजोडीने इतरही अनेक मुद्द्यांवर प्रकाश टाकला आहे.
नॉनस्टिकची भांडी वापरणे योग्य आहे का, ऍल्युमिनिअमची भांडी वापरावी का, तसेच इतरही अनेक भांड्यांबद्दल गृहिणींच्या मनात असणाऱ्या शंकांचे निरसन यातून होऊ शकेल. अशी भांडी वापरताना घ्यायची काळजी, स्वच्छतेच्या टिप्स अशाही महत्त्वाच्या गोष्टी यात आहेत. तेलबिया, त्यांचे गुणधर्म, त्यापासून तेल तयार होण्याची प्रक्रिया, अंड्याचे गुणधर्म, फळे, भाज्या, सुकामेवा, ओट्स, तेल-तूप-लोणी अशा जवळपास सर्वच पदार्थांबाबत यात लिखाण आहे.