Namrata Shirodkar
28/09/2016
नारायण धारप हे माझे प्रचंड आवडते लेखक आहेत . त्यांची मार्केटमध्ये उपलब्ध असलेली सगळी पुस्तकं मी खरेदी केली आहेत . छाया या पुस्तकात छाया आणि उभे आडवे धागे अशा २ लघुकादंबऱ्या आहेत . या दोन्हीही भयकथा नाहीत . छाया कौटुंबिक कादंबरी तर उभे आडवे धागे ही क्राईम - रहस्य टाईप कथा आहे . छाया अत्यंत उत्कृष्ट कादंबरी आहे . तर उभे आडवे धागे हे मला धारपांनी लिहिलेलं सगळ्यात कमी आवडलेलं लेखन आहे .