Summary of the Book
महाराष्ट्रीयन एव्हरेस्टवीराने लिहिलेले एव्हरेस्ट मोहिमेबद्दल प्रथमच असलेले “स्वप्नातून सत्याकडे-एव्हरेस्टची स्वप्नपूर्ती” हे पुस्तक म्हणजे प्रत्येक व्यक्तीला एक प्रेरणास्त्रोत आहे.
सोलापूरसारख्या सपाट भूप्रदेशात जन्मलेल्या आनंद बनसोडे या युवकाने बालपणीच जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट चढाई चे स्वप्न पाहिले व अत्यंत खडतर परिश्रम करून सर्वस्व पणाला लावून स्वप्नपूर्ती केली. याशिवाय एव्हरेस्ट कॅम्प-२ वर भारताचे राष्ट्रगीत वाजवून लिम्का बुक रेकॉर्ड व युनिक वल्ड रेकॉर्ड मध्ये आपले नाव नोंदवले.
आनंदचा हा स्वप्नपुर्तीचा प्रवास एका छोट्या झोपडीतून सुरु होवून इंग्लंड, अमेरिका, नेपाळमधून जगाच्या सर्वोच्च उंचीवर घेवून जाणारा आहे. आयुष्यात मोठे स्वप्न पाहून ते पूर्ण करण्यासाठी कसे प्रयत्नशील राहावे व कोणत्याही कठीण परिस्थितीत मार्गक्रमण करून यश कसे मिळवावे याची शिकवण देणारे प्रेरणादायी पुस्तक वाचकांना त्यांच्या “स्वप्नातून सत्याकडे ...” घेवून जाईल.