Summary of the Book
हे पुस्तक म्हणजे डॉ. संजय ओक यांचं मुक्त भाष्य आहे. डॉक्टरी व्यवसायातील अनेक अनुभव आणि त्या विश्वातील एक घटक असतानाही त्याकडे बघतानाची त्रयस्थ वृत्ती हि पुस्तकाची वैशिष्ट्ये. मात्र, केवळ डॉक्टरी विश्वच नव्हे; तर आसपासच्या घटनांचाही ते वेध घेतात. स्वतंत्र अस्तित्व असलेल्या कल्पना आणि मुग्धा, जगणं शिकवणारी स्वाती, रॅगिंग, स्वेच्छामरण, आय. सी. यू. वैद्यकीय शिबिरं, वृद्धत्व असे अनेक विषय आणि माणसं आपल्याला भेटतात. 'सातत्यातील सौंदर्य ' किंवा 'लव्हाळी व्हा, बांबू नको!' यांसारख्या छोटेखानी लेखांतून मोठें विषय हाताळले आहे. वेगवेगळ्या घटनांतून, संदर्भातून आणि प्रसंगातून आसपास आकाराला येतो/ काही घटना खास, तर काही प्रातिनिधिक. या घटनांमधून आणि माणसांच्या वर्तणुकीतूनच जगणं उलगडत जातं.