राग - लोभ, सुख - दु:ख अशा विविध भावना मानवी जीवनात असल्यानेच प्रत्येकाला वेगळे अनुभव रोज येत असतात. अशा क्षणांनी भरलेल्या माणसांच्या गोष्टी सुकुमार नितारे यांनी 'थँक गॉड' या कथासंग्रहातून सांगितल्या आहेत. यातील अनेक कथा सकारात्मक आहेत 'कॉमन मॅन' चे जीवन जगताना रंजिस आलेला 'लॉटरी' तील मांजरेकरच्या आयुष्याला आत्मविश्वासाचे बळ मिळते ते वडिलांनी स्वप्नात येऊन दिलेल्या सल्ल्याने. प्रेम असफल ठरल्यावर अन्य मुलाबरोबर लग्न झालेल्या प्रांजळच्या आयुष्यात वैधव्य येते. दु:ख सारून पुढे जात असताना मैत्रिणीच्या नवऱ्याच्या रुपात पूर्वीचा प्रियकर भेटतो; पण त्याच्याबरोबर जाण्याचा मोह ती कसा टाळते हे 'प्रांजळ श्रीरंग साने' मधून समजते. नोकरी नाही, हाती पैसा नाही अशा स्थितीत वडिलांची शस्त्रक्रिया कशी करायची, या चिंतेतील नायकाच्या मदतीसाठी शालेय मित्र धावून येतो; पण त्याने दिलेल्या पैशाचे पाकीट हरविते. एका अनामिकाच्या प्रामाणिकपणामुळे त्याच्या तोंडून 'थँक गॉड' हे शब्द बाहेर पडतात. माणसाच्या आयुष्यात घडणारे अनेक प्रसंग दहा कथांमधून समोर येतात.
‘थॅंक गॉड’ या पुस्तकाचा परिचय वाचा ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर...
http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4799298583598627201