गानकोकिळा, स्वरसम्राज्ञी आदी विशेषणांनी गौरविलेल्या व भारतरत्न सन्मानप्राप्त लता मंगेशकर म्हणजे भारतीय चित्रपटांच्या सुवर्णकाळातील सोनेरी पान आहेत. १९५० ते १९७० या काळातील सर्व संगीतकारांची पहिली पसंती लता मंगेशकर असे. अलौकिक प्रतिभेच्या या गायिकेच्या शास्त्रीय, निमशास्त्रीय सोलो आणि व्दंव्दगीतांचा नजराणा रत्नाकर फडके यांनी 'स्वरसम्राज्ञी लता' मधून पेश केला आहे. गुलाम हैदर, मदन मोहन, वसंत देसाई, रोशन, सी. रामचंद्र, सचिनदेव बर्मन, नौशाद, खेमचंद प्रकाश, राहुल देव बर्मन, शंकर - जयकिशन, कल्याणजी - आनंदजी, अनिल विश्वास आदी संगीतकारांची लता मंगेशकर यांनी गायलेल्या निवडक गाण्यांचे रसग्रहण, गाण्यांची सौंदर्यस्थळे, संगीतकारांचा परिचय व खास आठवणी यातील प्रत्येक प्रकरणांमधून दिल्या आहेत. 'ऐ मालिक तेरे बंदे हम', 'याद रखना चाँद तारों, इस सुहानी रात को', 'मोहे भूल गये साँवरिया' 'आयेगा आयेगा आनेवाला', 'तुम क्या जानो तुम्हारी याद में हम कितना रोए' अशी अनेक सुरेल गीते व व्दंव्दगीतांच्या या स्वरयात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे यातील प्रत्येक गाण्यातील आधाररागांची नोंद यात दिली आहे.
‘स्वरसम्राज्ञी लता’ या पुस्तकाचा परिचय वाचा ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर...
http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5058882000292149007