Summary of the Book
बाधकाम व्यावसायिक शंकरराव बोरकर यांचे श्वेता गानू यांनी लिहिलेले हे चरित्र आहे. आईच्या डोळ्यातील अश्रू सहन न झाल्याने साखर कारखाना उभारण्याची जिद्द बाळगून मेहनतीने त्यांनी आपले स्वप्न पूर्ण केले.
बोरकर यांचे व्यक्तिमत्व विकास, व्यवसायाची मुहूर्तमेढ, व्यवसायातील अडचणींवर मात करून सातत्याने पुढे जाण्याची तळमळ या पुस्तकात वाचायला मिळते.
संकटांशी लढताना त्यांना मिळालेली पत्नीची साथ, कौटुंबिक आयुष्याची ओळखही होते. बोरकर यांच्या व्यावसायिकतेबरोबरच त्यांच्या धार्मिकतेची आणि दातृत्वाची माहितीही लेखनात आली आहे.