Summary of the Book
हे पुस्तक एखाद्या अध्यात्मिक चिंतनिकेसारखे वाचकांना अंतर्मुख करणारे आहे. कवीला जशी कविता सहजपणे स्फुरते तसे विचारवंत साधकाला सहजपणे स्फुरलेले हे अध्यात्मिक विचार आहेत. श्री. जांभेकरांच्या या अध्यात्मिक चिंतनिकेत त्यांनी ईश्वरावरील श्रद्धा, दैव, प्रारब्ध, नियती, माया, अहंकार, आत्मा व परमात्मा, सेवा, मानवी देह, सुख-दु:ख अशा विविध विषयांवर केलेले चिंतन वाचावयास मिळेल. एका चिंतनशील प्रापंचिक विचारवंताचे हे स्वगत वाचताना वाचकही अंतर्मुख होतील व अध्यात्मिक आनंदाचा अनुभव त्यांना लाभेल अशी खात्री वाटते.