Summary of the Book
व्हिएतनाममधील प्रदीर्घ लढ्याचे समग्र दर्शन घडवणारे मराठीतले पहिले पुस्तक!
दुसर्या महायुद्धात जपानचा पराभव झाल्यावर , व्हिएतनामला फ्रेंच साम्राज्यवाद्यांच्या जोखडातून आपली मान सोडवण्याची संधी प्राप्त झाली. फ्रेंच निघून गेले, परंतु तेथे सुरु झालेला अंतर्गत झगडा हा शीतयुद्धाचाच एक भाग मानून, अवास्तव अभिनिवेशाने अमेरिकेने स्वत:ला या संघर्षात गुंतवून घेतले.
दोन तपांहून अधिक चाललेल्या या युद्धाची समग्र पार्श्वभूमी, हो-चि-मिन्ह याने दिलेला प्रखर लढा, अमेरिकेची व्हिएतनाममधील पाशवी नीति आणि अटळ शोकांतिका, याचे यथातथ्य, मनोवेधक निवेदन या पुस्तकात आढळेल.