Summary of the Book
8 प्रयोगक्षम रहस्यप्रधान एकांकिकांचा हा संग्रह…
रत्नाकर मतकरी यांच्या गाजलेल्या गूढकथांमध्ये जी नाट्यपूर्ण विविधता दिसते, तीच या एकांकिकांमधून दिसून येते.
अतींद्रिय अनुभवांपासून ते वास्तवातील विसंगतींपर्यंत, भविष्याच्या चाहुलीपासून ते अपराधगंडापर्यंत, तरल परीकथेतील अबोल दुःखापासून ते परकायाप्रवेशापर्यंत, सार्या गूढगहन विषयांना मतकरींची रहस्य-एकांकिका कवेत घेते.
आणि त्याच वेळी त्यांच्यातला दिग्दर्शक या एकांकिकांना आगळीवेगळी रंग-रूपे बहाल करतो. दोनच नटांनी कथा घडवण्यापासून, ते एकाच नटाने दोन भूमिकांचा यशस्वी आभास निर्माण करण्यापर्यंत, फ्लॅश-बॅक तंत्रातील अनेक दृश्यीय पार्श्र्वभूमीपासून ते रात्रीच्या ऑफिसच्या बंदिस्त वास्तवापर्यंत… परीकथेच्या तरल, नृत्यसदृश्य हालचालींपासून ते गुप्तहेरकथेच्या स्वाभाविक संदेहापर्यंत…
अनेक पोत… अनेक रचना… महत्त्वाकांक्षी दिग्दर्शकाला आव्हान देणार्या… एकांकिका ही एके काळी, एक साहित्यप्रकार म्हणून लिहिली जात होती… आज ती स्पर्धांमधून दिग्दर्शकाचे कसब दाखवणारे दृश्य-माध्यम म्हणून वापरली जाते…
या दोन्हींमधील समतोल हे रत्नाकर मतकरींच्या तंत्रकुशल नाट्यलेखनाचे सामर्थ्य… एकांकिका या नाट्यप्रकारात स्वारस्य असणार्या प्रत्येकाने संग्रही ठेवायलाच हवा, असा हा 8 एकांकिकांचा संग्रह…
.