काचखड्यांची नक्षी
Available Immediately

 
Hard Copy Price: 25% OFF
R 200 R 150 / $ 1.92
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
जीवनात अनेक अनुभव येत असतात. अनेक प्रसंग घडत असतात. त्यात जाणवलेली रूपे, त्याच्याशी निगडित आठवणी, विचार यांची गुंफण प्राजक्ता पटवर्धन यांच्या ‘काचखड्यांची नक्षी’तून विणली आहे. अमेरिकेत पहिल्यांदा जाताना आपला देश, गाव, घर सोडावे लागणार असल्याने होणारी घालमेल व नंतर पतीच्या भेटीची हुरहूर ‘फ्लाइंग टू यूएस’मधून व्यक्त केली आहे. ‘हू आय एम’मध्ये शेजारी देश, तेथील नागरिक यांविषयी वाटणारी शत्रुत्वाची भावना सीमा ओलांडून गेल्यानंतर कशी गळून पडते, हे समजते. घरात घरटे करण्यासाठी जागा शोधणाऱ्या चिमणीची आणि बागेत आलेल्या बिनपंखांच्या पोपटाची गोष्ट अनुक्रमे ‘आणि तिनं जिंकलं...’ व ‘औटघटकेचा पाहुणा’मध्ये आहे. आपण रोज अनेक आवाज ऐकतो. या आवाजांचे वेगळेपण लेखिकेने ‘ठेवणीतील आवाज’मधून टिपले आहे. जेथे बालपण गेले, त्या घराबद्दलचं ममत्व ‘तासगावचं घर’मधून व्यक्त होते, तर बसप्रवासाची गंमत ‘अगं अगं बशी...’मध्ये अनुभवायला मिळते. असे विविध विषयांवरील २७ लेख या पुस्तकात आहेत.

‘काचखड्यांची नक्षी’ या पुस्तकाचा ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील परिचय वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा... http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5403761582978143000
Book Review
Write a review

Anita
05 Sep 2019 05 30 AM

प्राजु खूप मस्त आहे पुस्तक ,तुझ्या आठवणी वाचता वाचता नकळत वाचक ही स्वतः च्या आठवणीत रमून जातो , खूप खूप धन्यवाद इतक्या छान छान आठवणींच्या खजिन्याचा नजराणा सर्वासमोर ठेवलास ,तुझ्या काचखड्यांची नक्षी खूप सूंदर रेखाटली आहेस ,ती आठवणींची नक्षी वाचून आपणही जमत नसताना दोन चार रेखोट्या ओढून जमेल तशी नक्षी काढावी का ?इतक्या छोट्या छोट्या प्रसंगातील छोटे छोटे अनुभव वाचताना आपल्या ही आयुष्यात असेच काहीतरी घडून गेले आहे , त्यावरची अलगतपणे धूळ झटकली जाते आणि लख्ख दिसू लागते ,आणि नकळत पापण्या ओलावतात , आपण इतक्या सहजपणे आयुष्याकडे पाहत असतो पण प्राजु ने छोट्या गोष्टीत किती आनंद शोधला हे जाणवते, बाळाचं आगमन असू दे की दवाखान्यात इमर्जन्सी असू दे ,किंवा केनेटिक मधले ऋतू असू देत ,प्रत्येक लेख परत परत वाचण्यासारखे आहेत , इतकी छान लेखिका, कवयित्री, गझलकारा , आपल्याला इतक्या वर्षांनी भेटली , आपली मैत्रीण होऊन सहजपणे आपल्यात मिसळली , खूप आनंद होतोय,कौतुक आहे 💕😍@⁨Prajakta Patwardhan/ Gokhle⁩
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat