Summary of the Book
सद्गुरू स्वामी निगमानंद देव यांचे हे पुस्तक योगसाधनेविषयी परिपूर्ण मार्गदर्शन करते. मूळ बंगाली भाषेतील या पुस्तकाचा इंग्रजीसह भारतीय भाषांमध्येही अनुवाद झाला आहे. चार विभागांत असलेल्या या पुस्तकाचा पहिला भाग योग कल्प. या विभागात योग कशाला म्हणतात, योगाची श्रेष्ठता, तत्व आदींची माहिती दिली आहे. दुसऱ्या साधना कल्प या विभागात साधना पद्धतीचा उपदेश केला आहे.
तिसऱ्या मंत्र कल्प या विभागात दीक्षाप्रणाली, मंत्र जागरण, मंत्र विधी, जपाचे कौशल्य आदींची माहिती आली आहे. स्वर कल्प हा चौथा विभाग आहे. या विभागात स्वराचे स्वाभाविक नियम, श्वासाचे फळ आदींविषयी लिहिले आहे. योग आणि स्वरोदय शास्त्र यांचा संबंध त्यातून समजतो. सामान्य वाचकापासून साधकापर्यंत ते उपयुक्त.